*ज्यूदो येलो बेल्ट परीक्षेतील विजेत्यांची गगनभरारी,ज्यूदो खेळ म्हणजे सभ्यतेचा मार्ग होय-गणेश मराठे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्यूदो येलो बेल्ट परीक्षेतील विजेत्यांची गगनभरारी,ज्यूदो खेळ म्हणजे सभ्यतेचा मार्ग होय-गणेश मराठे*
*ज्यूदो येलो बेल्ट परीक्षेतील विजेत्यांची गगनभरारी,ज्यूदो खेळ म्हणजे सभ्यतेचा मार्ग होय-गणेश मराठे*
नंदूरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन व नंदुरबार जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सौजन्याने नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या खेळाडू मुला मुलींना सुवर्ण संधी मिळावी करीता दोन दिवसीय बेसिक ग्रासरुट लेव्हल टेक्निकल ज्यूदो ट्रेनिंग कॅम्प चे आयोजन एस.ए. मिशन जिमखाना येथे करण्यात आले होते.ज्यूदो प्रशिक्षण शिबिरामध्ये जिल्ह्यातील 39 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सर्व खेळाडूंचा सत्कार नंदुरबार जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे व सचिव संतोष मराठे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला बेसिक ग्रासरुट लेव्हल टेक्निकल ज्यूदो ट्रेनिंग कॅम्प मध्ये चिमुकल्यांना हसत खेळत सर्वांगीण व्यायामाचे अनेक नविन प्रकार शिकविले, उदा. सुष्म वॉर्मअप त्यानंतर ज्यूदो मॅट वर पडणे आणि उटणे, रांनिंग फ्रॉग जंप, फ्रंट रोल ,बॅक रोल, उशिरो उकेमी, फ्रंट फॉल, साईट फॉल कुमिकाता ग्रीप पकडणे, मॅट वर थ्रो मारणे ओ गोशी, ओची गारी, एप्पोन शिओनागे, को उची गारी, ओ सईकोमी हे सर्व बेसिक प्रकार शिकविले त्यानंतर ज्यूदो खेळाचे महत्त्व सांगताना गणेश मराठे म्हणाले की ज्यूदो हा खेळ अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखला जातो आणि तो ऑलिम्पिक दर्जेचा पाच टक्के आरक्षित खेळ आहे त्यामुळे करिअर चा दृष्टीने देखील योग्य ठरणारा आहे. येलो बेल्ट परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
सौम्य माळी, सुजल गिरासे, मनस्वी गायकवाड, निधी चौधरी, रियांश केसवानी, प्रेम गिरासे, प्रियांश राजपूत, अरहान शहा, सिया पाटील, यदनेश पाटील, आरव पाटील, पूर्वी म्हसदे, ऋषी गिरासे , नकुल महाजन, उमेश गिरासे , ऋषिकेश माणिक, दिपराज गिरासे, कनिष्का राजपूत, आयुष पाटील, हिमांशू म्हसदे, नेहा महाजन, हिमांशु ठाकूर, याशिका महाजन, गौरव मराठे, राजवर्धन भदाने, गौरव मगरे, दुर्गेश धनगर, प्राजक्ता भदाणे विशेष सहकार्य म्हणून
महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक, सचिव दत्ता आफळे यांनी नंदुरबार जिल्ह्यावर विश्वास ठेवला त्या बद्दल नंदुरबार जिल्हा संघटना सदैव ऋणी राहिल सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.



