*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
*प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी*
राजापूर(प्रतिनिधी):-अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाची राजापूर तालुक्याची कार्यकारीणी नुकतीच निवड करण्यात आली. तालुका कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक चांगदेव गोसावी यांची तर,सचिवपदी बलभीम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाची राजापूर तालुक्याची कार्यकारीणीची नुकतीच सभा संपन्न झाली. या सभेला संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रघुवीर बापट, भिमराव कोंडविलकर, जिल्हा कोषाध्यक्ष मेघनाथ गोसावी, जिल्हा प्रतिनिधी रसाळ, ज्येष्ठ शिक्षक काळे, बोडके, बाचिपले यांच्यासह मोठ्यासंख्येने सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये राजापूर तालुक्याची नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक चांगदेव गोसावी, उपाध्यक्षपदी धनाजी माळवे, सागर येवले, सचिव म्हणून बलभीम पाटील, कार्याध्यक्ष म्हणून बाबुराव जावळे, कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षक विलास धुमाळे, जिल्हा महिला प्रतिनिधी म्हणून कविता आईर, तालुका महिला आघाडी प्रमुख म्हणून आरती पाटील यांची निवड झाली. यांची निवड करण्यात आली. अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाच्या राजापूर तालुका कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देताना नवनिर्वाचित अध्यक्ष गोसावी यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यास आपण वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नुतन कार्यकारीणी पदाधिकार्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.



