*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
*चावरा पब्लिक स्कूलचा 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुलींचा संघ विजयी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेत नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलच्या 14 वर्षे वयोगटात मुलींचा संघ विजयी झाला. हा संघ विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार जिल्हा क्रीडा परिषद यांच्या विद्यमाने नवापूर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट या स्पर्धेत नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूल नंदुरबार 14 वर्षे आतील मुलींचा संघ विजयी होऊन विभागीय स्पर्धेत सहभाग घेणार असून नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुलींचा संघात कर्णधार- माही पटेल, कोठारी, श्रुती पाटील, हेतांक्षा शिंदे, ओजल क्षीरसागर, कनक चौगावकर, पूर्वी पाटील, हनिशा सेवानी, उर्वी पटेल, वेदिका पाटील, अनुसया तडवी, मृणाल पाटील, शांकभरी पाटील, प्रचिती चावडा, जानवी पाटील हे खेळाडू सहभागी होते. यशस्वी खेळाडूंना चावरा पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक फादर टेनी परक्का, उपमुख्याध्यापक सिस्टर जेसलीन, ऍडमिनिस्टेट फादर रेमी वडकन, जनरल कॉर्डिनेटर सिस्टर दिव्या, सेक्शन कॉर्डिनेटर हर्षदा गुरव, सेक्रेटरी शितल पाटील यांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले. मुलींना क्रीडा शिक्षक संदिप खलाणे, प्रकाश मिस्तरी यांचे मार्गदर्शन लाभले.



