*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात संविधान दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी.टी. पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात संविधान दिवस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.जे. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. रघुवंशी यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यांनी संविधान हे भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहे. प्रत्येक युवक युवतीने संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. आपले कर्तव्य, हक्क, अधिकार याविषयीची माहिती आपणास मिळते असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. संदिप पाटील यांची उपस्थिती होते. संविधान दिनाविषयी समिती प्रमुख डॉ. उपेंद्र धगधगे यांनी माहिती दिली.
संविधान उद्देशिकेचे वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. मनोज शेवाळे यांनी केले.
यावेळी 26/11 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमच्या संयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ. डी. बी. देवरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुलतान पवार, प्रा. संदिप बडगुजर, प्रा. पी.सी. भील, प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास बहुसंख्य प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



