*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
*सार्वजनिक गुजराथी हायस्कूलचा खेळाडू जयेश गोसावी यास राष्ट्रीय सब-ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नवापूर येथील दि एन.डी.अॅण्ड एम. वाय.सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच. जे.शाह कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू जयेश गोसाव याने 10 व्या राष्ट्रीय सब- ज्युनिअर डॉजबॉल अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्णपदक मिळविले आहे. महाराष्ट्र संघाच्या विजयात जयेश गोसावी याचा मोलाचा वाटा आहे.
पाटन (गुजरात) येथे झालेल्या राष्ट्रीय सब -ज्युनिअर अजिंक्यपद डॉजबॉल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुली संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकविले. तसेच मुले व मुली मिश्र स्पर्धेत देखील महाराष्ट्र संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकविले आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या संघात नवापूर येथील दि एन.डी. अॅण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 10 वी चा खेळाडू जयेश सुनील गोसावी याचा समावेश होता. जयेश गोसावी या खेळाडूने राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत महाराष्ट्र संघाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा आहे. जयेश गोसावी यास शाळेचे क्रीडा शिक्षक निलेश गावंडे, श्रीकांत पाटील व राष्ट्रीय प्रशिक्षक आशिष जगताप, शरद बढे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल राष्ट्रीय डॉजबॉल खेळाडू जयेश गोसावी याचे संस्थेचे अध्यक्ष विपिन चोखावाला, उपाध्यक्ष शिरीष शाह, कार्याध्यक्षा शितल वाणी, कोषाध्यक्ष सतीश शाह, सचिव राजेंद्र अग्रवाल, सहसचिव शोएब मांदा, सर्व व्यवस्थापन मंडळातील सदस्य तरच शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका कमलबेन परिख, उपप्राचार्य नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका निर्जला सोनवणे, पर्यवेक्षक जाहीद खान पठाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी कौतूक केले.



