*26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन*
*26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-26/11/2008 रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नंदुरवार जिल्हा पोलीस दलातर्फे 26 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस मुख्यालय येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचा उद्देश शहीद जवानांना अभिवादन करणे तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हा रुग्णालयाचे सहकार्याने पोलीस मुख्यालयाचे आवारात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबीराचे ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी भेट देत स्वतः रक्तदान केले तसेच जिल्हा पोलीस दलातील जास्तीत जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार, कार्यालयीन स्टाफ यांनी रक्तदान करावे यासाठी त्यांना प्रोत्साहीत केले. नमुद कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) अनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, तसेच जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी श्रीमती डॉ. रमा वाडीकर व इतर वैदयकीय अधिकारी, व पथक असे उपस्थित होते. सदर रक्तदान शिबीरात विविध पोलीस ठाणे, कार्या. शाखा, तसेच पोलीस मुख्यालय येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मंत्रालयीन स्टाफ अशांनी स्वेच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले.



