*सेंट अँथनी हायस्कूलमध्ये 'टेक्नोव्हा' प्रदर्शनात डिजिटल व्यसनावर जागरूकता सत्र:पालक-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेंट अँथनी हायस्कूलमध्ये 'टेक्नोव्हा' प्रदर्शनात डिजिटल व्यसनावर जागरूकता सत्र:पालक-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन*
*सेंट अँथनी हायस्कूलमध्ये 'टेक्नोव्हा' प्रदर्शनात डिजिटल व्यसनावर जागरूकता सत्र:पालक-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन*
मुंबई(प्रतिनिधी):-सेंट अँथनी हायस्कूल, वाकोला,सांताक्रूझ पूर्व येथे शाळेच्या वार्षिक दिनानिमित्त पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात डिजिटल व्यसनाच्या वाढत्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यात प्रदर्शन आणि व्याख्यानांचा समावेश होता. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी समिती सदस्य आणि राष्ट्रीय प्रशिक्षक बॉस्को डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र यशस्वी झाले.
वार्षिक उत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय जावीर (शिक्षण निरीक्षक, पश्चिम प्रदेश), मॅनेजर रेव्ह.डॉ. फादर फ्रान्सिस कार्व्हालो आणि पर्यवेक्षक श्रीमती सँड्रा कार्डोझो यांची उपस्थिती लाभली. श्री विवेक साळवी यांच्या समन्वयाने बॉस्को डिसोझा यांनी मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये वेगाने वाढणाऱ्या डिजिटल व्यसनावर प्रकाश टाकला. यासाठी एन.आय. एस. डी.चा शक्तिशाली 'नवचेतना मॉडेल' पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या मॉडेलद्वारे डिजिटल व्यसनाच्या परिणामांवर उपाययोजना आणि प्रतिबंधक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यवस्थापक रेव्ह. फ्र. डॉ. फ्रान्सिस कार्व्हालो,
मुख्याध्यापिका: सिस्टर शैलेत सेबॅस्टियन,
पर्यवेक्षक श्रीमती सॅंड्रा कार्डोझा, श्रीमती मोना डालमेट आणि श्रीमती रियाली डाबरे यांनी उत्कृष्ट पाठिंबा दिला. सत्राचा शेवट प्रश्नोत्तर सत्राने झाला, ज्यात पालक आणि शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षक आणि पालकांनी या व्यावहारिक सत्राची प्रशंसा करताना, असा कार्यक्रम भविष्यात वारंवार, विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याची मागणी केली. डिजिटल युगातील व्यसनाच्या धोक्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हे सत्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. शाळेच्या वार्षिक दिवसाच्या निमित्ताने आयोजित हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरले.



