*जिल्ह्यात 2 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात 2 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर*
*जिल्ह्यात 2 डिसेंबरला नगरपरिषद निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य शासनाने 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा या चार नगर परिषदांमध्ये याच दिवशी मतदान पार पडणार आहे.
मतदारांना मतदानाचा हक्क निर्विघ्नपणे बजावता यावा, यासाठी ही सुट्टी लागू राहणार असून शासन, अर्धशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँकांनाही ती बंधनकारक असेल. विशेष म्हणजे, या नगरपरिषदांच्या हद्दीबाहेर नोकरी करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांनाही सुट्टीचा लाभ मिळेल. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. शांत, पारदर्शक आणि सुरळीत मतदान होण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या बळकटीकरणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



