*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड नंदुरबार येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड नंदुरबार येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड नंदुरबार येथे राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुक्यातील बामदोड शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संविधानाचे महत्व, त्यातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, तसेच युवा पिढीने संविधानातील मूल्ये प्रत्यक्षात आणण्याची गरज स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना "संविधान हा देशाच्या विकासाचा पाया असून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की तो त्याची अंमलबजावणी जीवनात प्रामाणिकपणे करावी," असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. कल्याणी चौधरी, प्रा. जागृती शेवाळे, प्रा. भावना वसावे, प्रा. पूजा गायकवाड, प्रा. श्रद्धा पटेल, यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जागृती शेवाळे यांनी केले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष योगिता पाटील सचिव गणेश पाटील आणी प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी कौतुक केले. राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त भरलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणी बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्व अधोरेखित करणारा ठरला.



