*पश्चिम खान्देश भिल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे भारतीय संविधान दिन दोन सत्रात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पश्चिम खान्देश भिल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे भारतीय संविधान दिन दोन सत्रात साजरा*
*पश्चिम खान्देश भिल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे भारतीय संविधान दिन दोन सत्रात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित वनवासी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व एस. सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय, चिंचपाडा येथे भारतीय संविधान दिन दोन सत्रात साजरा करण्यात आला. प्रथम सत्रात प्रेमल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती, नवापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी व दुपार सत्रात माध्यमिक विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी चिंचपाडा स्टेशन परिसरात प्रभात फेरी काढली तदनंतर झालेल्या कार्यक्रमात शिलवंत वाकोडे यांनी संविधान हे फक्त पुस्तक नसून जीवन जगण्याची पद्धत आहे हे स्पष्ट करून संविधान निर्मिती, संविधान निर्मितिच्या प्रक्रियेत सहभागी सदस्यांचे योगदान, संविधानाचे महत्व या सोबतच संविधानातील कलम यांचा परिचय विध्यार्थ्यांना करून दिला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी भूमी दिलीप गावित हिने संविधानातील महत्वाच्या मुद्द्यावर माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सेल्फी पॉईंटची निर्मिती केली. प्रेमल पाडवी यांनी संविधान व आज संविधानाची गरज याची मांडणी केली. श्रीमती नंदा गांगुर्डे यांनी संविधान का आवश्यक आहे हे स्पष्ट केले इ. 7 वी च्या विद्यार्थिनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेची प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती सादर केली. 5 वी च्या विध्यार्थिनींनी मूलभूत हक्क व आपली कर्तव्य यावर नाटिका सादर केली. यावेळी पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले विद्यालयाच्या 150 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पोस्टर स्पर्धेचे परीक्षण प्रदीप देसले यांनी केले. पोस्टर स्पर्धेत इ. 5 वी ते 7वी गटात प्रथम -
प्रथम -शफूरा खाटीक
द्वितीय- श्वेता गावित
तृतीय- दिव्या वसावे
8वी ते 10 वी गटात
प्रथम-समर्थ परदेशी
द्वितीय- रहिमा तेली
तृतीय- समर्पण भट्टी
उत्तेजनार्थ- अंजली वसावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाडवी, प्रास्ताविक डी. एस. गावित, श्रीमती सुवर्णा चौधरी यांनी तर आभार लक्ष्मण गावित यांनी मानले
कार्यक्रमाच्या दोन्ही सत्रात शैलेजा कापडिया, शुभम परदेशी, निलेश भागवत, संदिप साळुंखे, राजु गावित, राजन गायकवाड, संदिप महाले, धनंजय कुलकर्णी, संदिप आहेर, डी. एस. साळी, पूनम चव्हाण, भारत झाटे, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



