*राजापूर वन विभागातील 12 मजुर प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी लवकरच मिळणार, आदिनाथ कपाळे यांचा सातत्याने पाठपुरावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर वन विभागातील 12 मजुर प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी लवकरच मिळणार, आदिनाथ कपाळे यांचा सातत्याने पाठपुरावा*
*राजापूर वन विभागातील 12 मजुर प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी लवकरच मिळणार, आदिनाथ कपाळे यांचा सातत्याने पाठपुरावा*
राजापूर(प्रतिनिधी):-परिमंडळामध्ये 248 गावांचा सामावेश होतो. सदर गावांमध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडत असतात, तसेच गवा, बिबट्या, वानर, माकड इ वन्यप्राण्यांकडून प्राणघातक हल्ल्याच्या आणि रेस्क्यूच्या घटना वारंवार घडत असतात. सदयस्थितीत राजापुर परिमंडळामध्ये 1 वनपाल व 1 वनरक्षक एवढा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सदर वन्यजीव संरक्षणांच्या कामांकरीता तसेच प्राणघातक हल्ला होऊ नये आणि झालाच तर त्याच्या उपाययोजनाकरिता उपलब्ध कर्मचारी वर्ग हा अपुरा पडत आहे. सदर परिमंडळामध्ये तात्पुरत्या स्वरुपात वनमजुरांची उपलब्धता झाल्यास वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या काम अधिक सुलभ व तत्परतेने करणे शक्य होईल. तरी पंचायत समिती गण निहाय 1 मजुर असे 12 पंचायत समिती गण एकुण 12 मजुर प्रस्तावांला प्रशासकीय मंजुरी मिळुन अनुदान उपलब्ध होण्याबाबतचा प्रस्ताव अनेक दिवसापासून प्रशासनाकडे प्रलंबित आहे. काही दिवसापूर्वी तुळसवडे गावातून जाताना आडवली गावचे सुभाष हरी पवार हे रिक्षा घेऊन चालले होते. त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून ते सुदैवाने बचावले. परंतु गंभीर दुखापत झाली. अशा अनेक घटना आपल्या राजापूर तालुक्यात घडत आहेत परंतु वनविभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याकारणाने अशा घटना आटोक्यात येणे प्रशासनाला अशक्य झाले आहे. म्हणूनच यासंदर्भात तात्काळ निर्णय घेऊन सदर प्रस्ताव मंजूर करणेबाबत रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. वनमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेत सदर प्रस्ताव मंजूर करणेबाबत वनखात्याच्या अपर मुख्य सचिव यांना आदेश दिले आहेत. या कामात आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाळे यांनी पुढाकार घेतला असून ते देखील सदर गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.



