ताजा खबरे:
*पीएम श्री शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न*
*नागरिकांची फसवणूक करुन सिमकार्ड Activate (कार्यान्वीत) करणारे 4 सिमकार्ड विक्रेते सायबर सेल पोलीसांच्या ताब्यात
*अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे करणारा विधी संघर्ष बालक पोलीसांच्या ताब्यात*
*जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा*
*मोलगी हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एकुण 3 आरोपींसह 1 लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पीएम श्री शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पीएम श्री शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न*

  • Share:

*पीएम श्री शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा गुणवत्ता कक्ष जि.प. नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या परिपत्रकानुसार  नवापूर तालुक्यातील श्रावणी केंद्राची  शिक्षण परिषद पीएम शासकीय आश्रम शाळा, ढोंगसागळी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व देवमोगरा माता यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजन करण्याचा केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ शिक्षक जगदीश कोकणी, केंद्रीय मुख्याध्यापक महेंद्र नाईक, ढोंगसागाळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पाऊल गावीत, ग्यान प्रकाशन फाउंडेशन समन्वयक सौ. क्रांती सोनवणे, ढोंग शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री भामरे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, सौ. मंदाकिनी देसले, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांचा समावेश होता.
डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे आढावा व चर्चा घडवून आणली, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन, शासन निर्णय वाचन करून आढावा व चर्चा घडवून आणली. निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी  निपुण मित्र यांची नियुक्ती करणे. पत्र वाचन व अंमलबजावणी करणे. मूल्यवर्धन प्रशिक्षणाची वर्गपातळीवर अंमलबजावणी करणे,  जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे आढावा व चर्चा घडवून आणली. निपुण महाराष्ट्र अभियान कार्यक्रम आढावा व नियोजन जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे आढावा व चर्चा व नियोजन करणे.
केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी, राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे आढावा, चर्चा, नोंदणी व शिक्षकांचे प्रातिनिधिक स्वरुपात अनुभव सादरीकरण घेणे. शंका व प्रश्न निरसन उपरोक्तवर झालेल्या विषयांच्या अनुषंगाने केंद्रप्रमुखांनी अनुधावन घेवून उपस्थित शिक्षकांचे शंका निरसन करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्यान प्रकाशन फाउंडेशन जिल्हा समन्वयक क्रांती सोनवणे, सीआरजी सदस्य महेंद्र नाईक, गणेश पाडवी, ईश्वर गावित, मिलिंद जाधव यांनी मार्गदर्शन केले. केंद्रस्तरीय सहविचार शिक्षण परिषद मध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी आयोजित शिक्षण विभागामार्फत विविध शैक्षणिक, डिजिटल व गुणवत्तावृद्धी उपक्रमांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. केंद्रप्रमुख निंबा पाकळे यांनी सर्व शासकीय निर्देश, पोर्टल्स व उपक्रमांची सविस्तर माहिती देत अंमलबजावणीसाठी सूचना केल्या.
बैठकीत संगीतमय शालेय परिपाठ राबविणे, तसेच एकाच आवासातील मुलांची व मुलींची शाळा असल्यास एकत्रीकरणाचे प्रस्ताव सादर करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच विद्यार्थ्यांच्या शिकण्या-शिकवण्याच्या गुणवत्तेसाठी विद्या समीक्षा केंद्र अधिक प्रभावीपणे वापरण्याचे निर्देश देण्यात आले.
डिजिटल माध्यमांतर्गत युडायसप्लस, ड्रॉपबॉक्स, शाळा पोर्टल, शिक्षक व विद्यार्थी पोर्टल यांचा 100% आढावा ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच विदयांजली पोर्टल व विकसित भारत पोर्टल वर सर्व शाळांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली. विनोबा अ‍ॅप व खान अकॅडमी गणित उपक्रमाच्या वापरावरही विशेष भर देण्यात आला.
शिष्यवृत्ती परीक्षेत सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळांचा 100% सहभाग अनिवार्य असून प्रत्येक शाळेने स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.  आरटीई अक्ट 2009 नुसार एक कि.मी. आत प्राथमिक व तीन कि.मी. आत उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्धतेनुसार वर्गवाढ प्रस्ताव सादर करण्यास आणि कमी पटाच्या शाळांसाठी समुह शाळा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.
विद्यार्थी सुरक्षेसाठी तीन प्रकारच्या तक्रार पेट्या, निपुण महाराष्ट्र उपक्रम, संविधान दिवस, विद्यार्थी सुरक्षा अहवाल, स्वच्छ व हरीत विद्यालय नोंदणी, परसबाग, शालेय पोषण आहाराची सद्यस्थिती, विद्युत सुविधा व थकबाकी माहिती, अनु. जमाती कल्याण समिती माहिती नियमितपणे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करून रजिस्टर ठेवणे व निधी संकलनाची माहिती जतन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व शाळांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमासाठी नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी तालुका विज्ञान प्रदर्शन सहभाग, शिक्षक -अधिकारी क्रिडा स्पर्धा सहभाग, तसेच सर्व प्रशासकीय व शैक्षणिक नोंदी अद्ययावत ठेवण्यासंबंधीही मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीमुळे केंद्रातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक दर्जा, डिजिटल नोंदणी, विद्यार्थी सुरक्षा व एकत्रित उपक्रमांना नक्कीच गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रम राबविणे, विद्यार्थी प्रगती, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आदी मुद्द्यांवर परिषदेतील सर्वांनी मते मांडली व केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन करण्यात आले. श्रावणी केंद्रांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत
मुख्याध्यापक पाऊल गावीत,
तंत्रस्नेही शिक्षक प्रमोद वसावे
तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय परिश्रम घेतले. परिषदेसाठी केलेली नियोजनबद्ध तयारी, शैक्षणिक सादरीकरणे, साहित्य निर्मिती, तांत्रिक सहकार्य आणि शाळास्तरीय संघटन या सर्व बाबींमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धीसाठी प्रतिबद्ध असलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. उपस्थित अधिकारी, शिक्षक आणि मान्यवरांनी या कार्यसंघाचे मनः पूर्वक कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रावणी केंद्रातून बदली झालेल्या शिक्षक बंधू भगिनींचे पुष्पगुच्छ, शाल, गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक सूत्रसंचलन कृष्णा रायते यांनी केले व उपस्थितांचे आभार मनिषा कोकणी यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पीएम श्री शासकीय आश्रम शाळा ढोंगसागाळी येथे श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद यशस्वीरीत्या संपन्न*
November, 26 2025
*नागरिकांची फसवणूक करुन सिमकार्ड Activate (कार्यान्वीत) करणारे 4 सिमकार्ड विक्रेते सायबर सेल पोलीसांच्या ताब्यात
November, 25 2025
*अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे करणारा विधी संघर्ष बालक पोलीसांच्या ताब्यात*
November, 25 2025
*जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा*
November, 25 2025
*मोलगी हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एकुण 3 आरोपींसह 1 लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
November, 25 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज