*धडगावमध्ये नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंसाठी भव्य चहा सेवा; समाजसेवी भावनेला वाहवा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धडगावमध्ये नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंसाठी भव्य चहा सेवा; समाजसेवी भावनेला वाहवा*
*धडगावमध्ये नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंसाठी भव्य चहा सेवा; समाजसेवी भावनेला वाहवा*
धडगाव(प्रतिनिधी):-नर्मदा परिक्रमेचे यात्रेकरू आज बिलगाव (पुलाणापाडा) परिसरात दाखल झाले असताना, स्वागतासाठी संपूर्ण परिसर उत्साहाने भारला होता. यात्रेकरूंच्या सेवेसाठी सुमारे 2000 ते 2500 भाविकांना चहाची व्यवस्था करून समाजसेवेचा सुंदर आदर्श घालण्यात आला.या उपक्रमात भारतीय समाज सेवा संस्था यांनी पुढाकार घेतला असून तथा सुरतान पावरा यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका निभावली. यात्रेकरूंची सेवा हा धर्मापेक्षा मोठा ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले.या सेवाभावी कार्यात पुढाकार घेणाऱ्या टीममध्ये जदा पावरा, बाहदऱ्या पावरा, विरसिंग पावरा, शिवाजी पावरा, नरेंद्र पावरा आणि जामसिंग पावरा यांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. परिक्रमा वासिना बाबा गुरु यांच्या उपस्थितीत झालेल्या या सेवेबद्दल यात्रेकरूंनी मनापासून समाधान व्यक्त करत
"ही तर खरी सेवापरंपरा आणि आदिवासी बांधवांचा आदरातिथ्याचा संस्कार!"
अशी भावना व्यक्त केली. धडगाव तालुक्यातील या उपक्रमामुळे समाजसेवेची भावना उंचावली असून कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



