*सानेगुरुजी ग्रंथालय कळसवलीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सानेगुरुजी ग्रंथालय कळसवलीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम*
*सानेगुरुजी ग्रंथालय कळसवलीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम*
राजापूर(प्रतिनिधी):-साने गुरुजी ग्रंथालय कळसवली, को.म.सा.प शाखा राजापूर व सुप्रभा वाचनालय कोंडीवळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचा बक्षीस समारंभ तसेच साने गुरुजी ग्रंथालयाच्या सेवानिवृत्त ग्रंथपाल सौ. शिल्पा शरद साखळकर यांचा सत्कार व शुभेच्छा समारंभ ग्रंथालय चळवळींचे जेष्ठ मार्गदर्शक, बालसाहित्यिक मदन हजेरी यांच्या शुभहस्ते दि. 26 नोव्हेंबर दु. 2 वाजता श्रीम उमा श परुळकर माध्यमिक विद्यालय वडवली येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शरद साखळकर (अध्यक्ष - साने गुरुजी ग्रंथालय) भुषविणार असून सदर कार्यक्रमाला शिक्षण प्रेमी, मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन वासुदेव तुळसणकर अध्यक्ष को.म.सा.प. शाखा राजापूर, सुप्रभा वाचनालय, वैभव ठाकूर देसाई कार्यवाह साने गुरुजी ग्रंथालय कळसवली, विनोद मिरगुले कार्यवाह को.म.सा.प शाखा राजापूर, संजय गोतावडे कार्यवाह सुप्रभा वाचनालय कोंडीवळे आणि मुख्याध्यापक विलास शिंदे श्रीम उमा शरद परुळकर माध्यमिक विद्यालय वडवली यांनी केले आहे स.10.30 ते 1 या वेळेत कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



