*चित्राक्षरांची जुगलबंदी, संदेश पत्र संग्रहाचा नव्याने प्रवास*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चित्राक्षरांची जुगलबंदी, संदेश पत्र संग्रहाचा नव्याने प्रवास*
*चित्राक्षरांची जुगलबंदी, संदेश पत्र संग्रहाचा नव्याने प्रवास*
मुंबई(प्रतिनिधी):-जवळपास 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर यावेळी दिवाळीनिमित्त चित्र काढायला आणि तीन ते चार वर्षानंतर संदेश पत्रांसाठी मान्यवरांना पत्र लिहायला घेतली. अर्थात त्याला निमित्त होते आमची कन्या अक्षरा. अक्षरा यावर्षी दुसरी मध्ये शिकत असून तिला चित्रकलेची खूप आवड, त्यामुळे गेली अनेक वर्षे माझ्या डोक्यात असलेली संकल्पना मी तिच्याकडून पूर्णत्वास न्यायचे ठरवले. आणि दिवाळीपूर्वी साधारण 8 ते 10 दिवस मी तिच्या मागे लागलो होतो की, मला भारतीय पोस्ट कार्डवर साधे सोपे चित्र काढून दे, मला यावर्षी दिवाळी निमित्त मान्यवर व्यक्तींना अशा वेगळ्या शुभेच्छा पाठवायच्या आहेत. गेले चार दिवस तिने वेगवेगळी चित्रे मला काढून दाखवली. निसर्ग चित्र, फुलदाणी आणि वारली चित्रकला. अखेर शेवटी वारली चित्रकला पसंतीस उतरली. कोणतेही मार्गदर्शन न घेता स्वतः च्या कल्पकतेने तिने काढलेले ते चित्र पाहून मला आनंद तर झालाच, शिवाय मलाही चित्र काढण्याचा मोह आवरला नाही. ते चित्र पाहून तिला अजून थोडे मार्गदर्शन करून अजून चांगले चित्र कसे काढता येईल याकडे लक्ष द्यायला सांगितले आणि नकळत मीही भारतीय पोस्ट कार्डवर साध्या पेनने चित्र काढायला घेतले. मलाही समजले नाही की एवढ्या मोठ्या खंडानंतर माझ्याकडून कसे चित्र तयार होईल? पण, बऱ्यापैकी आल्याचे माझ्या लक्षात आले. अर्थात काही गोष्टींवर अधिक लक्ष दिले तर अजून बऱ्यापैकी चित्र येऊ शकते, याचीही जाणीव झाली. आणि एका पाठोपाठ एक पोस्टकार्डावर चित्र येऊ लागली. वारली चित्रकलेतून त्यांची परंपरा, त्यांची वेगळी लोककला, त्यांचे जीवनमान, त्यांची जीवनशैली हे आपसुकच उतरविण्याचा प्रयत्न सुरू केला. एकामागोमाग एक चित्र येऊ लागली आणि त्यावर माझ्या हस्ताक्षरात दीपावली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा संदेश लिहू लागलो. ही चित्राक्षरांची जुगलबंदी अनुभवताना एक वेगळेच समाधान मिळू लागले. जे शब्दबद्ध होऊच शकत नाही, एवढे मात्र निश्चित. यावर्षी दीपावली आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने अशी किमान 500 पत्रे पाठविण्याचा मानस आहे. अर्थात यानिमित्ताने आमच्या संदेश पत्र संग्रहाला पुन्हा एकदा प्रदीर्घ कालावधी नंतर नव्याने सुरूवात होत आहे, याचाही आनंद आहेच. ही चित्राक्षरांची जुगलबंदी मनाला एक समाधान आणि आपल्या आवडीच्या कामाला पुन्हा नव्याने प्रारंभ करण्यास कारण ठरली, एवढे मात्र निश्चित. निकेत नरहरी पावसकर, तळेरे (सिंधुदुर्ग)
अक्षरोत्सव परिवार, तळेरे कॉल 9860927199,
व्हॉट्स अँप 9403120156



