*कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र किनारी जल पर्यटन सुरू करण्याची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र किनारी जल पर्यटन सुरू करण्याची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची मागणी*
*कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र किनारी जल पर्यटन सुरू करण्याची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची मागणी*
सिंधुदुर्ग(प्रतिनिधी):-तिलारी धरणावर ज्याप्रमाणे जल पर्यटन सुरू होणार आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने जल पर्यटन कोकणातील सर्वच नद्या, खाड्या, समुद्रकिनारी सुरु होणे आवश्यक आहे, व त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या एक खिडकी योजने द्वारे सुलभतेने सर्वानाच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोकणात रोजगार निर्मिती होईल देशातून, परदेशातूनही पर्यटक कोकणात येतील त्यामुळे कोकणाचा विकास होईल, भारताची सुद्धा आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व सर्वच पालकमंत्री यांनी इच्छा शक्ती दाखवून त्वरित तशी घोषणा करावी आणि योजना अंमलात आणावी अशा मागणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका निवेदनाद्वारे आमदार कालीदास कोळंबकर आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे, या निवेदनात कोकणच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पर्यटन विकास होणे गरजेचे आहे, त्यासाठी कोकणातील सर्वच बंदरांचा विकास अलिबाग जवळील मांडवा बंदर विकास धर्तीवर व्हावा अनेक वर्षे बंद केली गेलेली बोट पूर्ववत सुरू करावी. सर्व बंदरात पर्यटन दृष्ट्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता केंद्र सरकारने भरीव निणधी उपलब्ध करून देणे आवश्यकता आहे.