*नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग*
*नागपूर पुस्तक महोत्सवात गाजणार नंदुरबारकराचे थीम साँग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नॅशनल बुक ट्रस्ट, नवी दिल्ली तर्फे नागपूर येथे झिरो मागील फाऊंडेशनने 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेल्या पुस्तक महोत्सवासाठी थीम सॉंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील 721 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून नंदुरबार येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार शशिकांत घासकडबी यांच्या शीर्षक गीताला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. 10, 000 रूपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून या पुस्तक महोत्सवासाठी सर्व कार्यक्रमात हे गीत स्वरबद्ध करून गायले जाणारे आहे. यामुळे नंदुरबारच्या साहित्य विश्वात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल शशिकांत घासकडबी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सौ.वर्षा घासकडबी नंदुरबार



