*शिवसेनेचे संपर्कनेते चंद्रकांत रघुवंशी यांची उदासीनता; नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर-बंडखोरीच्या उमेदवारीची ठिणगी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेनेचे संपर्कनेते चंद्रकांत रघुवंशी यांची उदासीनता; नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर-बंडखोरीच्या उमेदवारीची ठिणगी*
*शिवसेनेचे संपर्कनेते चंद्रकांत रघुवंशी यांची उदासीनता; नवापूर शिवसेना कार्यकर्ते वाऱ्यावर-बंडखोरीच्या उमेदवारीची ठिणगी*
नवापूर(प्रतिनिधी):–शिवसेनेचे संपर्कनेते आणि आमदार चंद्रकांतजी रघुवंशी यांनी गेल्या वर्षभरापासून नवापूर तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे गंभीर आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडून समोर येत आहेत. या वाढत्या नाराजीतून आज नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेली अपक्ष उमेदवारी ही प्रत्यक्षात बंडखोरीची ठिणगी ठरली आहे.
एक वर्ष संपर्क… पण प्रतिसाद शून्य!
माजी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की, ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीचे असून त्यामुळेच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करू इच्छित होते. यासाठी त्यांनी संपर्कनेते चंद्रकांत भैय्या रघुवंशी यांना अनेक वेळा भेटून सर्व कार्यकर्त्यांची यादीही दिली. मात्र पाच महिने उलटूनही रघुवंशी यांनी कोणत्याही विषयावर न चर्चा केली, न निर्णय घेतला, उलट “बघू, करू” अशा आश्वासनांतच वेळ काढल्याचा आरोप आहे. रघुवंशींच्या दुर्लक्षामुळे प्रवेशासाठी थेट मुंबईत धाव, निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी नंतर आमदार आमश्या पाडवी यांच्याशी संपर्क साधल्यावरच त्यांचा प्रवेश ठरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत प्रवेश संपन्न झाला.
परंतु त्यानंतरच्या बैठकीत संपर्क प्रमुख व आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांचे चिरंजीव जिल्हाप्रमुख राम रघुवंशी यांनी पदवाटपाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. तालुका प्रमुख व शहरप्रमुख एवढीच दोन पदे देऊन बाकी सर्व पदे धूळ खात पडली, अशी कार्यकर्त्यांची नाराजी. नगरपालिका निवडणुकीतही ढाकळपट्टी; बैठका गायब
नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यावर रघुवंशी यांनी इच्छुकांना पत्र देऊन उमेदवारी मागवली. 7 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत 10 नोव्हेंबर रोजी अंतिम बैठक व उमेदवार जाहीर करण्याचे आश्वासन दिले. मात्र 10 नोव्हेंबरची बैठकच घेण्यात आली नाही.
दरम्यान राष्ट्रवादीने 23 नगरसेवकांची संपूर्ण यादी जाहीर केली, पण त्यात एकही धनुष्यबाणाचा उमेदवार घेतलेला नाही किंवा कोणतीही युती घोषित झालेली नाही. "नाईलाजास्त आम्हाला बंडखोरी करावी लागली" — कार्यकर्त्यांचा आरोप
या सगळ्या गोंधळामुळे व शिवसेनेतील स्थानिक नेतृत्वाच्या अकार्यक्षमता, निष्क्रियता आणि कार्यकर्त्यांकडे पूर्ण दुर्लक्षाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे उमेदवाराचे म्हणणे आहे. त्यांच्या शब्दांत “नेतृत्वाच्या बेफिकीरीमुळे आज आम्हाला बंडखोरीच्या मार्गावर उतरावे लागत आहे.



