*काथर्दे खुर्द येथे आदिवासी क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा जयंती व आनंददायी शनिवार उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काथर्दे खुर्द येथे आदिवासी क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा जयंती व आनंददायी शनिवार उत्साहात साजरा*
*काथर्दे खुर्द येथे आदिवासी क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा जयंती व आनंददायी शनिवार उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, काथर्दे खुर्द येथे आदिवासी जननायक क्रांतिकारी वीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तसेच ‘आनंददायी शनिवार’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, गिते सादर करून बिरसा मुंडा यांच्या देशासाठीच्या योगदानाची आठवण करून दिली. शिक्षकांनीही त्यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. गौरी वळवी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तुषार सनाणसे उपस्थित होते. प्रारंभी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे व माहिती सादर केली. प्रमुख पाहुणे डॉ. सनाणसे यांनी गुणवत्ता दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. यानंतर ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उभे- बसणे कवायत, शारीरिक तंदुरुस्तीचे विविध उपक्रम शिकवले. शैक्षणिक वातावरणात आनंदाचा समावेश करत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. याप्रसंगी पोलीस पाटील ईश्वर वळवी, उपसरपंच गणेश वळवी, अंगणवाडी सेविका संगीता पाडवी, सुभाष कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विजय सोनवणे व श्रीमती शारदा कडवे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तुकाराम अलट, आभार प्रदर्शन श्रीकांत वसईकर यांनी मनले. कार्यक्रमाला उपस्थित सर्वांच्या सहभागामुळे जयंती उत्साहात आणि अनुशासनात संपन्न झाली.



