*वाटूळ बेलाचेकोंड वाडी येथील युवक अनिरुद्ध चव्हाण याचा वाघिणीने केला पाठलाग, ग्रामस्थ भयभीत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाटूळ बेलाचेकोंड वाडी येथील युवक अनिरुद्ध चव्हाण याचा वाघिणीने केला पाठलाग, ग्रामस्थ भयभीत*
*वाटूळ बेलाचेकोंड वाडी येथील युवक अनिरुद्ध चव्हाण याचा वाघिणीने केला पाठलाग, ग्रामस्थ भयभीत*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील वाटूळ बेलाचेकोंड वाडी मधील युवक अनिरुद्ध अनिल चव्हाण यांचा वाघिणीने पाठलाग केल्याची धक्कादायक घटना 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता घडली. सुदैवाने या घटनेत अनिरुद्ध चव्हाण यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्राप्त माहितीनुसार अनिरुद्ध चव्हाण आपल्या घराकडून त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने आपल्या मोटारसायकल वरुन देवळात जात असताना रस्त्याच्या बाजूच्या जंगलातून एक वाघिण आपल्या बछड्यांसह अचानक बाहेर आली आणि त्याच्यावर झेप घेतल्या सारखी धावत आली प्रसंगावधान राखून अनिरुद्धने तत्काळ पळ काढला. काही वेळानंतर वाघिण आपल्या बछड्यांसह पुन्हा जंगलात निघून गेली. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले यासंदर्भात वाडीतील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दादा चव्हाण, ग्रामस्थ प्रकाश पांडुरंग चव्हाण, रवींद्र पांडुरंग चव्हाण, रामचंद्र इंदूलकर यांच्या मार्फत या वाघिणीच्या हालचालीची तत्काळ माहिती वनविभागाकडे निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.



