*आदर्श आचारसंहितेमुळे ‘महिला लोकशाही दिन’ स्थगित-संजय पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदर्श आचारसंहितेमुळे ‘महिला लोकशाही दिन’ स्थगित-संजय पाटील*
*आदर्श आचारसंहितेमुळे ‘महिला लोकशाही दिन’ स्थगित-संजय पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम -2025 जाहीर केला असून या घोषणेनुसार, 04 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचार संहिता अंमलबजावणी सुरू असल्याने निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही, असे महिला लोकशाही दिन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा त्यांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी आणि पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शन मिळावे यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येत असतो, असेही महिला लोकशाही दिन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पाटील यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



