*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीरास भरघोस प्रतिसाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीरास भरघोस प्रतिसाद*
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर आयोजित रक्तदान शिबीरास भरघोस प्रतिसाद*
पुणे(प्रतिनिधी):-शहरात रक्ताचा अपुरा तुटवडा लक्षात घेता सालाबादप्रमाणे या वर्षी देखील सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) यांनी घेतलेल्या रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.'करुनी दान रक्ताचे, ऋण फेडू समाजाचे' या हेतूने एकूण 59 रक्तदात्यांनी पुणे शहरातून तसेच सर्व विभागामधील अनेक तरुण आणि तरुणींनी समाजबांधवांनी रक्तदान करून समाजाचे ऋण फेडण्याचे महत्वपूर्ण काम केले. समाजातील अनेक व्यक्तींनी या कार्यक्रमास उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. सह्याद्रीच्या सर्व शिलेदारांनी रणरागिणी यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले. विशेष सहकार्य सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेचे मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रामाणे यांनी अतिशय सुंदर रित्या करुन शेवटी सांगता करण्यात आली.



