*विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा आता फेब्रुवारी महिन्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा आता फेब्रुवारी महिन्यात*
*विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा आता फेब्रुवारी महिन्यात*
नांदेड(प्रतिनिधी):-उत्तराखंडमधील श्री केदारपीठाचे जगद्गुरु यांच्या पट्टाभिषेक सोहळ्यास 25 वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त विश्वशांती महायज्ञ व पट्टाभिषेक रजत महोत्सव पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आला आहे.
केदारपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची केदारपीठाचे 324 वे जगद्गुरु म्हणून 3 ऑक्टोबर 2000 मध्ये नेमणून झाली होती. या घटनेस 2025 च्या ऑक्टोबर महिन्यात 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी येथील श्री दशमुख आश्रम परिसरात विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. यासाठी देशविदेशातील विविध धर्मगुरु व राजकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धूम सुरु झाली असून या पार्श्वभूमीवर हा सोहळा आता डिसेंबर महिन्याऐवजी पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी होणार आहे. 5 फेब्रुवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 या दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवकथा, प्रवचन, कीर्तन, भजन यासह विविध संत महात्म्यांच्या आशीर्वचनाचा समावेश राहणार आहे, अशी माहिती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आली आहे.



