*मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस 4 सराईत गुन्हेगार अटकेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस 4 सराईत गुन्हेगार अटकेत*
*मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस 4 सराईत गुन्हेगार अटकेत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत चोरी झालेली मोटारसायकल स्थानिक पोलिसांनी अल्पावधीत शोधून काढत 4 आरोर्पीना अटक केली असुन त्याबाबत सविस्तर हकिकत अशी की, 6 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 15 वाजेच्या सुमारास मोटार सायकल मालक संजय पंडीत तिरमले भवानी नगर चिंतामणी गणेश मंदीराजवळ शहादा हे मच्छीमार व्यक्ती त्याची मोटारसायकल MH 39 AA 6814CT 100 ही सारंगखेडा गावाजवळील वाघेश्वरी पेट्रोलपंपाचे जवळ पार्क करुन मच्छीमार करण्यासाठी तापी नदीत गेले होते. त्यादरम्यान सदर मोटारसायकल अज्ञात इसमांनी चोरी केली होती त्याबाबत सारंगखेडा पो.स्टे. गुरनं 170/ 2025 भा.न्या.सं. कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सारंगखेडा पोलीसांनी तात्काळ दखल घेत सदर मोटारसायकलचा व मोटारसायकल चोराचा शोध सुरु केला असता तपासादरम्यान सदर मोटारसायकल ही शहादा शहरातील आरोपी तौसिफ शेख भिकम वय 25 वर्ष रा. गरीब नवाज कॉलनी, शहादां जि. नंदुरबार यांच्या कबाडखान्याजवळ मिळुन आल्याने ती जप्त केली व त्याबाबत अधिक तपास केला असता आरोपी शाहिद उर्फ सोनु शरिफ पिंजारी वय 21 वर्ष रा. माजीनगर, गरीब नवाज कॉलनी नंदुरबार मुफिस मुनाफ पठाण वय 27 वर्ष रा. मिरानगर शहादा ता. शहादा जि. नंदुरबार व अहमंद जहांगीर पिंजारी वय 23 वर्ष रा. नागसेन नगर शहादा ता. शहादा जि. नंदुरबार यांनी फिर्यादीची मोटारसायकलची प्रत्यक्ष चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. म्हणुन चारही आरोपींना 7 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करुनं 9 नोव्हेंबर 2025रोजी त्यांना न्यायालयात हजर केले असता 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन पोलीस कोठडी दरम्यान
आरोपींकडुन पोलीसांना आणखी 7 मोटारसायकल मिळुन आल्या त्यांच्या मालकी बाबत आरोपींकडे कोणतेही पुरावे नाहीत ते चोरीच्या असाव्यात असा पोलीसांचा दाट संशय आहे याच मुद्यावर पोलीसांचा तपास चालु चालु आहे. वर नमुद नमुद सर्व आरोपी हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडुन आणखी गुन्हे उघडकीस येतील अशी शक्यता आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रवण दत्त.एस., अपर पोलीस अधिक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सारंगखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि / रविंद्र बागुल, सह सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोउपनि / किरण बान्हे, पोउपनि / संजय ठाकुर, असई / चुनिलाल ठाकरे, पोहेकॉ/613 जलालोद्दीन शेख, पोहेकॉ/ ईश्वर ठाकरे, पोहेकों / भानुदास भामरे पोकॉ/राजु वळवी, पोकों/ सुरतसिंग राजपुत, पोकॉ योगेश भदाणे स्थागुशाचे पोना / विकास कापुरे, पोकों / शोएब शेख यांनी केली आहे.



