*श्रीमती डी आर हायस्कूलमध्ये 150 वा वंदे मातरम् वर्धापन दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती डी आर हायस्कूलमध्ये 150 वा वंदे मातरम् वर्धापन दिन साजरा*
*श्रीमती डी आर हायस्कूलमध्ये 150 वा वंदे मातरम् वर्धापन दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नरेंद्र सराफ, माजी कार्याध्यक्ष व ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य अशोक टेंभेकर, कार्यकारणी सदस्य व शाळेचे माजी मुख्याध्यापक पंकज पाठक, प्रमुख वक्ते नंदुरबार आगार प्रमुख संदीप निकम, आगार वाहतूक नियंत्रक, हितेश वसईकर, शाळेचे मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वंदे मातरम् गीताची पार्श्वभूमी व इतिहास दर्शवणारे पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
वंदे मातरम् गाण्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ संस्कृत शिक्षक प्रशांत जानी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संदीप निकम यांनी आपल्या मनोगतातून वंदे मातरम् गीताची महती, व्याप्ती प्रचंड आहे, क्रांतिकारकांना व तरुण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणारे व प्रेरणा देणारे स्फूर्ती गीत, नवनिर्मितीचा ध्यास, सुशिक्षित सुसंस्कृत पिढी घडवणारे तसेच पर्यावरण संरक्षण व निसर्गाशी सुसंवाद साधणारे,मानवाला कर्तव्य निष्ठा शिकविणारे गीत आहे असे विदीत केले. अध्यक्षीय भाषणात नरेंद्र सराफ यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्वातंत्र्यसंग्रामात स्फूर्तीदायक व प्रेरणादायक गीत म्हणजे वंदे मातरम् आहे. ते स्वतः रोज सकाळी एफ.एम रेडिओवर वंदे मातरम् गीत ऐकत असतात. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी रोज सकाळी हे गीत ऐकावे असे सूचित करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने शाळेत वंदे मातरम् गीताची पार्श्वभूमी व इतिहासावर आधारित पोस्टर प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वंदे मातरम् गीताची माहिती व जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे, सत्कार परिचय राहुल पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता शाळेतील विद्यार्थी यांनी वंदे मातरम् गीताने करण्यात आली. संगीत शिक्षिका भाविका खेडकर यांनी पेटीवर साथ दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी सहकार्य केले व शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.



