*श्रॉफ हायस्कूलमध्ये वंदे मातरम् गीताच्या दीडशे वर्षेपूर्तीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रॉफ हायस्कूलमध्ये वंदे मातरम् गीताच्या दीडशे वर्षेपूर्तीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम*
*श्रॉफ हायस्कूलमध्ये वंदे मातरम् गीताच्या दीडशे वर्षेपूर्तीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूलमध्ये वंदे मातरम् गीतास दीडशे वर्षेपूर्तीनिमित्त प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रश्नमंजुषेत वंदे मातरम्च्या इतिहासावर आधारित प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत उत्तरे दिली. वंदे मातरम् या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याने देशासह राज्यात वंदे मातरम् गीताच्या 150 वा वर्धापन दिन ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. नंदुरबार शहरातील श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूलमध्ये वंदे मातरम् गीताच्या दीडशे वर्षेपूर्तीनिमित्त प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वंदे मातरम् गीताचे गायन अनघा जोशी व त्यांच्या समुहाने सादर केले. वंदे मातरम् गीताची पार्श्वभूमीची ओळखही केशव राजभोज यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे संयोजन नरेंद्र सुर्यवंशी, मृणाल देवकर यांनी केले. या वंदे मातरम्च्या इतिहासावर आधारित प्रश्नमंजुषात सर्वात जास्त योग्य उत्तरे देणार्या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, पर्यवेक्षिका सीमा पाटील यांच्या हस्ते पारितोषिके देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमास शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



