*पाचलमधील भरवस्तीत बिबट्याचा वावर, खबरदारी घेण्याबाबत वनविभागाच्या ग्रामपंचायतीला सूचना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पाचलमधील भरवस्तीत बिबट्याचा वावर, खबरदारी घेण्याबाबत वनविभागाच्या ग्रामपंचायतीला सूचना*
*पाचलमधील भरवस्तीत बिबट्याचा वावर, खबरदारी घेण्याबाबत वनविभागाच्या ग्रामपंचायतीला सूचना*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील पाचल व गावठाण परिसरात बिबट्याचा वाढता वावर तसेच पाळीव प्राण्यांना भक्ष्य करण्याचे वाढते प्रकार यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे बिबटया वारंवार वस्ती जवळ येऊन पाळीव कुत्रे, मांजरे यांना लक्ष करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत या गंभीर परिस्थितीची दखल घेत राजापूर परिमंडळ वन अधिकारी तुकाराम बावदाने यांनी तातडीने ग्रामपंचायत पाचलचे सरपंच बाबालाल फरास यांना पत्र लिहून ग्रामस्थांनी कोणती खबरदारी घ्यावी यासंदर्भात महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत
वनविभागाने लिहिलेल्या पत्रात पाचलमधील बाजारवाडी येथे कै.शेठ माबल यांच्या पारसबागेत रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी बिबट्या दिसल्याची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली आहे तसेच तुषार पाचलकर यांनी बिबट्याच्या वावराबद्दल वनविभागाला कळवले आहे हा बिबट्या आजुबाजुच्या मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी व बिबट्या मानव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने खालील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यात प्रामुख्याने ग्रामस्थांनी रात्री 10 वाजल्यापासून ते स. 7 वाजेपर्यंत म्हणजेच यावेळेत बिबट्याचा वावर अधिक असतो यावेळी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे तसेच बाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर एकटे न जाता सोबतीला कोणाला तरी घेऊन जावे शक्य असल्यास वाहनाचा उपयोग करावा खबरदारी म्हणून हातात काठी किंवा बॅटरी सोबत घ्यावी. रस्त्यावर चालताना मोठ्याने बोलत जावे जेणेकरून बिबट्याला मानवी उपस्थितीची त्याला जाणीव होईल सर्वात महत्वाचे म्हणजे लहान मुलांना सांभाळण्या बाबत विशेष सूचना दिल्या आहेत संध्याकाळच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर पाठवणे पूर्णपणे टाळावे ग्रामस्थांना बिबट्याचा संशयित वावर दिसला किंवा त्यांने पाळीव प्राणी मारला किंवा जखमी केला तर वनविभागास कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामस्थांनी आपल्या घरासभोवतालचा 20 ते 30 चौ. मिटरचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच गावांमधून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूचे दिवे सुरळीतसुरू असल्याची खात्री करावी. गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनावश्यक झुडुपे साफ करून घेणे आवश्यक आहे असे वनविभागाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.



