*पंडित कौतिक माळी यांची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंडित कौतिक माळी यांची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
*पंडित कौतिक माळी यांची शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी पंडित कौतिक माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अखंड निष्ठा आणि कार्यतत्परतेने पक्षसंघटन मजबूत करणाऱ्या पंडित माळी यांच्या नियुक्तीचे जिल्हाभरात स्वागत होत आहे. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांपर्यंत माळी यांची ओळख एकनिष्ठ, प्रामाणिक आणि जनतेशी जोडलेल्या शिवसैनिक म्हणून आहे. त्यांनी शाखाप्रमुख, महानगरप्रमुख, शहरप्रमुख अशी विविध पदे यशस्वीरीत्या सांभाळत संघटन बळकट केले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबवून पक्षाचा झेंडा जनतेच्या मनात रुजवला आहे.
पंडित माळी यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना उबाठा पक्षाचे संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिवसेनेची ताकद अधिक दृढ होईल, असा उत्साह शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे. नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना पंडित माळी म्हणाले, "उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक बुलंद करू."
नंदुरबार जिल्हाभरातून त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरे करण्यात आले आहेत.



