*64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाटककार दशरथ राणे यांची दोन नाटके सादर होणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाटककार दशरथ राणे यांची दोन नाटके सादर होणार*
*64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाटककार दशरथ राणे यांची दोन नाटके सादर होणार*
मुंबई(प्रतिनिधी):-सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सोमवार 10 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे होणार आहे. सदर स्पर्धेत हौशी व कामगार रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार दशरथ राणे यांची दोन नाटके सादर होणार आहेत.18 नोव्हेंबर रोजी ठिक स. 11.30 वा."उसन्या बायकोची वरात लग्नाची" आणि 9 डिसेंबर 2025 रोजी सायं 7 वा. "बायको असून देखणी" हो दोन नाटके सादर होणार आहेत ही दोन्ही नाटके अनुक्रमे क्रांतिसिंह नाना पाटील नगर मित्र मंडळ, कोल्हापूर तसेच संस्कार बहुउद्देशीय सामाजिक संस्था भुयेवाडी ही मंडळी प्रयोग सादर करणार आहेत या नाट्य प्रयोगाला रसिकांनी आवर्जून रहावे असे आवाहन नाटककार दशरथ राणे यांनी केले आहे.