*उत्तरकार्यातील अनिष्ट प्रथेला फाटा देत दहिंदुले येथे वृक्षारोपण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*उत्तरकार्यातील अनिष्ट प्रथेला फाटा देत दहिंदुले येथे वृक्षारोपण*
*उत्तरकार्यातील अनिष्ट प्रथेला फाटा देत दहिंदुले येथे वृक्षारोपण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील दहिंदुले येथील सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास सजन मोगल (मराठे) यांचे नुकतेच 28 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले होते. त्यांच्या गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या दिवशी बाहेर काढून नेण्याच्या प्रथेला फाटा देत मोगल परिवाराकडून वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. शिक्षक रोहिदास मोगल यांनी अध्यापनाची सुरुवात गावातीलच शिवशंकर विद्यालयातून केली होती. त्याच शाळेच्या आवारात 8 नोव्हेंबर रोजी वृक्षारोपण करण्यात आले. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणी कायम टिकाव्यात यासाठी विविध उपक्रम राबविण्याची प्रभा ग्रामीण भागात आजही सुरु आहे. पण आपल्या वडिलांच्या स्मृती आठवणीत रहाव्यात व त्याचा उपयोग निसगार्तील सर्व प्राणी, पक्ष्यांना व्हावा यासाठी त्यांच्या स्मरणार्थ वटवृक्ष लागवड आणि त्यांचे अखंड संवर्धन करण्याचा संकल्प सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास मोगल यांचे भाऊ पंडीत मोगल, भगवान तानाजी मोगल व त्यांची मुले भुषण मोगल व प्रा. राहुल मोगल व पत्नी अल्काबाई मोगल यांनी कुटुंबीयांसह 10 वृक्षांची लागवड केली. मोगल कुटूंबातील सर्व सदस्य यांच्यासह नातेवाईक व समाज बांधव उपस्थित होते. मोगल परिवाराने राबविलेल्या या उपक्रमाचे दहिंदुले परिसरातून कौतुक होत आहे.



