*राजापूर तहसीलदार कार्यालय आवारात असलेल्या एकमेव आधार केंद्रामध्ये बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी गैरसोय*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूर तहसीलदार कार्यालय आवारात असलेल्या एकमेव आधार केंद्रामध्ये बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी गैरसोय*
*राजापूर तहसीलदार कार्यालय आवारात असलेल्या एकमेव आधार केंद्रामध्ये बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांनी गैरसोय*
राजापूर(प्रतिनिधी):-तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या एकमेव आधार केंद्रामध्ये तालुक्यातील ग्रामस्थांची मोठी गर्दी होत असताना या ठिकाणी साधी बसण्यीही व्यवस्था नसल्याने आधार नोंदणीसाठी रांगेत राहणाऱ्या वयोवृध्द ग्रामस्थांना चक्क जमिनीवर बसावे लागत आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून या आधार केंद्राच्या ठिकाणी ग्रामस्थांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष अजीम जैतापकर यांनी केली आहे. राजापूर शहरात विद्यमानक्षणी तहसील कार्यालयाच्या आवारात एकच आधारकेंद्र असून आधारकार्ड वरील नाव, जन्म तारीख नोंद, पत्ता, दुरुस्ती करणे आधारकार्ड अपडेट करणे यासाठी या आधार केंद्रावर सदैव तालुक्यातील ग्रामस्थीं मोठी गर्दी असते. या आधार केंद्रावर होणारी गर्दी पाहता शहरात आणखी एक आधार केंद्र सुरू करण्याबाबत यापूर्वी जैतापकर यांनी राजापूर तहसीलदार यांयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी राजापूर तालुक्यात आणखी चार आधार केंद्रांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली होती. मात्र अद्याप सदरी आधार केंद्र मंजूर झालेली नाहीत. दरम्यान राजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या या आधार केंद्रावर येणाऱ्या नागरीकांना गैरसोयां सामना करावा लागत आहे. आधार केंद्रावर मोठी गर्दी होत असल्याने ग्रामस्थांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागत आहे. रांगेत उभे राहणाऱया ग्रामस्थांना या ठिकाणी बसण्यीही व्यवस्था नाही. त्यामुळे नाईलाजास्तव जेष्ठ नागरीक तसा महिलांना जमिनीवर बसावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी ग्रामस्थांना बसण्यासाठी आधार केंद्राबाहेर पुरेशी बैठक व्यवस्था करावी, अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे.



