*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वती विभाग आयोजित दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वती विभाग आयोजित दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) पर्वती विभाग आयोजित दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
पुणे(प्रतिनिधी):-सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर ही संघटना नेहमीच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व तळागाळातील समाजबांधवांसाठी, गोरगरिबांसाठी काम करत असते. त्यातीलच एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम म्हणजेच दिवाळी फराळ वाटप हा उपक्रम आपण दरवर्षी विविध ठिकाणी राबवत असतो. यावर्षी आपण श्री छत्रपती प्रतिष्ठान संचालित निवासी मतिमंद विद्यालय (हिंगणे) पुणे येथील मुलांसोबत सामाजिक बांधिलकीची दिवाळी साजरी केली येथील मुलांना अन्नधान्य, कडधान्य, पेढे, दैनंदिन गरजेच्या वस्तू,दिवाळी फराळ आणि साफसफाई साहित्य देऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. हा कार्यक्रम पर्वती विभाग अध्यक्ष निलेश शिगवण यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संघाच्या वतीने सर्व दानशूर समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.