*एकलव्य विद्यालयाच्या कल्याणी वळवीची राज्यस्तरावर निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयाच्या कल्याणी वळवीची राज्यस्तरावर निवड*
*एकलव्य विद्यालयाच्या कल्याणी वळवीची राज्यस्तरावर निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित भगवान बिरसा मुंडा कला संगम विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये चित्रकला स्पर्धेत कल्याणी राजेश वळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला. तिने आदिवासी संस्कृतीतील गोंड कलेचा वापर करून चित्र काढले होते. तिला स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 7500 रुपये देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाप्रित्यर्थ विद्यालयातर्फे कल्याणीचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी तिचा सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के, चौधरी, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी, संतोष पाटील, राजेश वळवी, गौरीशंकर धुमाळ, मेधा गायकवाड उपस्थित होते. कल्याणीची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला विद्यालयाचे कला शिक्षक दीपक माळी व संभाजी गावित यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कल्याणीला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



