*कबचौउमवि'तर्फे श्रीराम दाउतखाने यांना पीएच.डी.प्रदान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कबचौउमवि'तर्फे श्रीराम दाउतखाने यांना पीएच.डी.प्रदान*
*कबचौउमवि'तर्फे श्रीराम दाउतखाने यांना पीएच.डी.प्रदान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातर्फे महिला महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्रीराम श्रीकृष्ण दाउतखाने यांना पीएच. डी. पदवी (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात विद्यावाचस्पती) प्रदान करण्याचे पत्र (नोटीफिकेशन)नुकतेच प्रदान करण्यात आले.त्यांनी शिंदखेडा येथील महाविद्यालयाचे ग्रंथापाल डॉ तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेशातील सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपालांचे जीवन कौशल्य विकसित होण्यासाठी तयार केलेल्या उपक्रमांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध लिहिला आहे. विद्यापिठाचे कुलगुरू प्रो. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते दाउतखाने यांना याबाबत अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. या वेळी प्र–कुलगुरू डॉ.एस.टी इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ महेंद्रभैय्या रघुवंशी, मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. जगदीश पाटील, मार्गदर्शक डॉ तुषार मल्हारराव पाटील, प्राचार्य डॉ सुनील कुवर, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्रीराम दाउतखाने हे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष असून विद्यमान रेड क्रॉस सोसायटीचे सचिव आहेत. शहरातील सामाजिक शैक्षणिक, संगीत, अवयव दान, अन्नदान ई चळवळीत सक्रिय असतात. या यशाबद्दल ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रा इंद्रसिंगजी वसावे व संचालक मंडळ, माजी प्राचार्य डॉ डी एस पाटील विद्यमान प्रभारी प्राचार्य डॉ सुनील कुवर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व समाजातील विविध घटकांनी अभिनंदन केले आहे.



