*संगमेश्वर येथे दि.6 नोव्हेंबर रोजी “अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबीर व कृषी प्रेरणा सत्र*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संगमेश्वर येथे दि.6 नोव्हेंबर रोजी “अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबीर व कृषी प्रेरणा सत्र*
*संगमेश्वर येथे 6 नोव्हेंबर रोजी “अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबीर व कृषी प्रेरणा सत्र*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती संगमेश्वर येथे 6 नोव्हेंबर 2025 रोजी कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बा. सा .को.कृषी विद्यापीठ दापोली, तालुका कृषि अधिकारी कार्यालय संगमेश्वर, गटविकास अधिकारी पंचायत समिती संगमेश्वर, ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी देवरुख या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “अश्वगंधा लागवड प्रशिक्षण शिबिर व कृषी प्रेरणासत्र” राबविण्यात येणार आहे. या शिबिरात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे स्वतः संगमेश्वर तालुक्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत याच बरोबर शिबिरात
अश्वगंधा लागवडीचे शास्त्रीय तत्त्व, बाजारातील वाढती मागणी, औषधी शेतीतून कोकणचा आर्थिक पुनर्जागरण” या विषयांवर तज्ञ प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
“कोकणातील सुपीक माती, सेंद्रिय परंपरा आणि शास्त्रीय मार्गदर्शन एकत्र आले तर शेतकऱ्यांचा नफा दुप्पट नाही, तर चौपट होऊ शकतो अश्वगंधा” कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णपीक! कमी खर्च, कमी पाणी, जास्त नफा, हेक्टरी उत्पन्न: 6 ते 8 क्विंटल आजचा भाव: ₹250 ते ₹450 प्रति किलो, हेक्टरी निव्वळ नफा: ₹1,75,000 पर्यंत कालावधी: फक्त 5–6 महिने तसेच थेट कंपनी खरेदीची हमी असणार आहे "जिवा ऑरगॅनिक कंपनी (कॅनडा)” व ॲग्रोस्टार शेतकरी कंपनी, देवरुख- संगमेश्वर यांच्या सहकार्याने: प्रत्येक शेतकऱ्याचा माल त्या दिवशीच्या बाजारभावाने विकत घेतला जाईल. बियाणे, सर्टिफिकेशन, प्रशिक्षणाचा खर्च – कंपनीकडून पूर्णपणे मोफत असेल, कोणतेही छुपे शुल्क नाही. फक्त सेंद्रिय लागवड 100% पारदर्शक व्यवहार.शासकीय अनुदानाची जोड!तालुका कृषि अधिकारी कार्यालय, संगमेश्वर यांच्यामार्फत ₹ 60,000 प्रती हेक्टर जास्तीत जास्त ₹ 1,20,000 प्रती शेतकरी अनुदान मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे. “या प्रकल्पामुळे संगमेश्वर तालुका आयुर्वेदिक शेतीच्या नकाशावर उजळेल. अश्वगंधा लागवड म्हणजे केवळ शेती नव्हे, तर एक आर्थिक परिवर्तनाची दिशा आहे असे मत तालुका गटविकास अधिकारी यांनी व्यक्त केले आहे “सेंद्रिय पद्धतीनं घेतलेल्या पिकाला कंपनीकडून पूर्ण खरेदी हमी आहे. या पद्धतीमुळे रासायनिक शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचा नफा अनेक पटींनी वाढेल.” याची हमी तालुका कृषी अधिकारी यांनी दिली आहे. या शिबिरात नाव नोंदणीसाठी ओंकार बेलोसे 9823456781, निखिल कोळवणकर 9420907388, रोहित पाटील (ॲग्रोस्टार) 7744051006, प्रणय भायनाक (कृषि विस्तार अधिकारी) 9823832863 / 9370526572 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा
नोंदणीसाठी “नाव, गाव, क्षेत्रफळ, सर्व्हे नंबर” व्हाट्सअपवर पाठवा. पेरणी कालावधी: 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025
विशेष सूचना:-
प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे
पहिल्या 100 शेतकऱ्यांना विनामूल्य कृषि दैनंदिनी व विशेष सवलत, प्रशिक्षण वर्गातच सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक माहिती दिली जाईल. फोनद्वारे माहिती न देता सर्व माहिती प्रत्यक्ष प्रशिक्षणात दिली जाईल. या शिबिरासाठी
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, संगमेश्वर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर, ॲग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनी, देवरुख-संगमेश्वर,
जीवा ऑरगॅनिक कंपनी (कॅनडा) आदी संस्थांनी सहकार्य केले आहे.



