*मांजरम जिल्हा परिषद गटातून ऐश्वर्या रातोळीकर ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मांजरम जिल्हा परिषद गटातून ऐश्वर्या रातोळीकर ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार*
*मांजरम जिल्हा परिषद गटातून ऐश्वर्या रातोळीकर ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार*
नांदेड(प्रतीनिधी):-नांदेडच्या नायगांव तालुक्यातील बहुचर्चित " मांजरम जिल्हा परिषद गट " हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे या गटातील रातोळी गावच्या भूमिक कन्या कु. ऐश्वर्या गंगाधरराव रातोळीकर ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातर्फे जिल्हा परिषदची निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कुमारी ऐश्वर्या गंगाधरराव रातोळीकर ह्या रातोळी नगरीचे माजी उपसरपंच गंगाधरराव पोटफोडे उर्फ (पटणे) यांची सुकन्या असून त्या पदविधारक उच्च विद्या विभूषित आहेत. माजी उपसरपंच गंगाधरराव पोटफोडे हे मागील 40 वर्षापासून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. यंदा मांजरम जिल्हा परिषद गटातून आपल्या मुलीस कु. ऐश्वर्या रातोळीकर यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या माध्यमातून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निश्चय केला असून त्यांनी मागील काही दिवसापासून सर्कल दौरा सुरु केला आणि मांजरम, गडगा, टेंभुर्णी, कोलंबी, नरंगल, कोपरा, नावंदी, मोकासदरा, लालवंडी, मरवाळी, आंचोली, गोदमगाव आदी गाव भेटी पूर्ण केल्या आहेत. आणि नुकतेच नायगांव तालुका येथे झालेल्या आढावा बैठकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाअध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांची भेट घेऊन मांजरम जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. यावेळी ऐश्वर्या गंगाधरराव रातोळीकर यांच्यासोबत विश्वंभर पाटील रातोळीकर, नंदू पाटील रातोळीकर, सतीश इंगोले, बालाजी मुकदम, शंकरराव गोपछडे, अंकुश पाटील, ताजुद्दीन पटेल, विलास पाटील मावलगे, राम पाटील, बालाजी मुकदम यांसह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.



