*नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-2025, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-2025, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर*
*नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-2025, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा या चार नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका करण्याचे आदेश जारी केले आहेत. या नेमणुका महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी ठरवून दिलेल्या निकषांनुसार करण्यात आल्या असून, संबंधित आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आला आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे, निवडणूक प्रक्रिया कर्तव्यदक्ष, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नंदुरबार नगरपरिषद
नंदुरबारच्या सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची नंदुरबार नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्य पाहतील, तर नंदुरबार तहसिलदार प्रदीप पवार यांची अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शहादा नगरपरिषद,
शहाद्याचे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांची शहादा नगरपरिषदेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्य पाहतील, तर तहसीलदार शहादा दीपक गिरासे यांची अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नवापूर नगरपरिषद,
तहसीलदार नवापूर दत्ता जाधव यांची नवापूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्य पाहतील, तर नायब तहसीलदार (संजय गांधी योजना) तहसील कार्यालय, नवापूर दिलीप कुलकर्णी यांची अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तळोदा नगरपरिषद,
तहसीलदार तळोदा दीपक धिवरे यांची तळोदा नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्य पाहतील, तर नायब तहसीलदार (उपविभागीय अधिकारी, महसूल कार्यालय) तळोदा जुबेर पठाण यांची अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पारदर्शक व शांततेत निवडणूक प्रक्रिया,
सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करून, नगरपरिषद निवडणुका 2025 शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थितरीत्या पार पाडाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची जबाबदारी यांचा समतोल राखत ही निवडणूक आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.



