*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयातर्फे दक्षता- आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयातर्फे दक्षता- आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह*
*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयातर्फे दक्षता- आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दक्षता जनजागृती सप्ताह-2025 चे अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयातर्फे
दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांबाबत
केंद्रीय दक्षता आयोगाने दक्षता- आपली सामायिक जबाबदारी या संकल्पनेवर दिनांक 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे करण्यात येणार असल्याचे जाहिर केले असून, त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 14 ऑक्टोबर 2025 चे परिपत्रकानुसार सदर कालावधीत राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांचे नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार कार्यालयात 27 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी सकाळी 10 वा. अधिकारी व अंमलदार यांना भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत शपथ देण्यात आली, राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री महोदय यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले. भ्रष्टाचार विरोधात जनजागृती व्हावी याकरीता मोलगी व धडगाव येथील सर्व शासकीय कार्यालयात तसेच बाजारपेठ, बस स्टॅन्ड परिसरात भ्रष्टाचार निर्मुलनासंबंधीचे पोस्टर लावण्यात आले. स्थानिक नागरीकांना भ्रष्टाचारविरोधी तकार असल्यास त्याबाबत ला.प्र.वि. नंदुरबार कार्यालयाचे टोल फ्री कमांक 1064, मो.क. ९४२३५४१०६४ व दुरध्वनी क्रमांक ०२५६४-२३१००९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच त्यांना स्थानिक बोलीभाषेतील माहितीपत्रके वाटण्यात आली. स्थानिक एनजीओ व महिला बचत गट यांचे माध्यमातून त्यांचे व्हॉटसअॅप ग्रुपवर सदर माहितीपत्रके प्रसारीत करण्यात आली. सदर वेळी ला.प्र.वि. नंदुरबार घटकाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सहापोउपनि/विलास पाटील, पोहवा/देवराम गावीत, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/संदिप खंडारे, पोहवा/विजय ठाकरे, पोहवा/हेमंतकुमार महाले, पोहवा/जितेंद्र महाले व पोना/सुभाष पावरा उपस्थित होते. नंदुरबार शहर व जिल्हयातील उर्वरीत तालुक्यात 2 नोव्हेंबर 2025 पावेतो सदर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून भ्रष्टाचाराविरोधी कोणतीही तकार असल्यास टोल फ्री क्रमांक 1064, मो.क.९४२३५४१०६४ व दुरध्वनी क्रमांक ०२५६४-२३१००९ यावर संपर्क करण्याचे आवाहन ला.प्र.वि. नंदुरबार घटकाच पोलीस उप अधीक्षक प्रशांत भरते यांनी केले आहे.



