*धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या स्थापनेसाठी शिवसैनिकांची कार्यशाळा, जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित; कक्ष प्रमुख डॉ.राजश्री अहिरावांचे मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या स्थापनेसाठी शिवसैनिकांची कार्यशाळा, जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित; कक्ष प्रमुख डॉ.राजश्री अहिरावांचे मार्गदर्शन*
*धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या स्थापनेसाठी शिवसैनिकांची कार्यशाळा, जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित; कक्ष प्रमुख डॉ.राजश्री अहिरावांचे मार्गदर्शन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिवसेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत गावपातळीपर्यंत कक्ष सुरू करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांना प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राज्य कक्षाच्या प्रमुख डॉ. राजश्री अहिराव यांच्या हस्ते सोमवारी संजय टाऊन हॉलमध्ये करण्यात आले. शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांच्या संकल्पनेतून “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबवून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविला होता.
त्याच धर्तीवर, शेवटच्या नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यभर गावपातळीपर्यंत कक्ष सुरू असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील कक्ष सुरू करण्यात येणार असल्याने सोमवारी संजय टाऊन हॉलमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्य कक्षाचे सहाय्यक मयूर कदम यांनी माहिती दिली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके, जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, शेतकी संघाचे चेअरमन बी.के पाटील, बाजार समिती सभापती दीपक मराठे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, माजी सभापती कैलास पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांच्यासह पालिकेचे माजी नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्य कक्षाच्या प्रमुख डॉ. राजश्री अहिरराव यांनी सांगितले, कक्ष चालवण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज असून, त्यासाठी संगणक वापरायचे ज्ञान असणारे 2 कार्यकर्त्यांची नावे देणे आवश्यक आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षण शिबिर आयोजित करायचे असल्याने संपर्क साधावा.



