*नंदुरबारात जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारात जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*
*नंदुरबारात जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथे आयोजित शालेय जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले. या स्पर्धेतील 14, 17 व 19 वर्षातील मुले व मुलींच्या एकुण 56 संघांनी सहभाग नोंदविला. क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व नंदुरबा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नंदुरबार यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. नंदुरबार येथील चावरा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर आयोजित शालेय टेनिस क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट अससोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा क्रीडा अधीकारी संजय बेलोलकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चावरा पब्लिक स्कूलचे ऍडमिनिस्टेट फादर रेमी वडकम हे होते. यावेळी 14, 17, 19 वर्षातील मुले व मुलींच्या एकूण 56 संघानी सहभाग नोंदविला. सूत्रसंचलन चावरा स्कूलचे क्रीडा शिक्षक दिनेश बैसाणे यांनी केले. आभार पोदार इंटरनॅशनल स्कूलचे क्रीडा शिक्षक अमोल पगारे यांनी मानले. या स्पर्धेचे पंच म्हणून जयेश राजपूत, रवींद्र शिंदे, मनीष गिरासे, राज आजगे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे नंदुरबार सचिव संदीप खलाणे, दिनेश बैसाणे, प्रकाश मिस्तरी, कैलास माळी, दिनेश महाले, श्रीकांत चव्हाण यांनी परिश्रम घेतले.



