*जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा-ध. बा. वळवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा-ध. बा. वळवी*
*जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा-ध. बा. वळवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. कलाम यांच्यावर लिखित ग्रंथाचे ग्रंथप्रदर्शन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या महिला महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्रीराम दाऊतखाने यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात दाऊतखाने यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रेरक चरित्रातील काही प्रसंग सांगितले. तसेच, त्यांच्या जडणघडणीत वाचनाचा कसा सहभाग होता, याची माहिती दिली. अनेक महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासात पुस्तकांचे स्थान फार मोठे होते, हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आजच्या बदलत्या काळातही वाचन हेच प्रगतीचे मोठे माध्यम आहे, हे त्यांनी उपस्थितांना पटवून दिले. या कार्यक्रमास ग्रंथालयाचे वाचक सभासद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी केले, तर सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले. परमेश्वर सानप यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली, असेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



