*आपल्यासाठी 24 तास चालणाऱ्या हृदयाच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढा-डॉ प्रसाद अंधारे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आपल्यासाठी 24 तास चालणाऱ्या हृदयाच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढा-डॉ प्रसाद अंधारे*
*आपल्यासाठी 24 तास चालणाऱ्या हृदयाच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढा-डॉ प्रसाद अंधारे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इंडियन रेड क्रॉस सोसायटी, लायन्स क्लब व माहेश्वरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ प्रसाद अंधारे यांचे हृदयाची काळजी कशी घ्यावी विविध हृदयरोग व हार्ट अटॅक आल्यावर सी पी आर कसा द्यावा या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले. डॉ प्रसाद अंधारे यांनी बदललेली जिवंशाली आहार शैली रोगाना कसे आमंत्रण देते या बाबत माहिती दिली व आठवड्यात किमान 150 मिनिटे तरी व्यायाम झाला पाहोजे असा सल्ला दिला. यानंतर नागरिकांनी विचारेल्या शंकाचे डॉ प्रसाद अंधारे यांनी निरसन केले. या व्याख्यानबाबत डॉ नूतनभाई शाह व प्राचार्य बी एस पाटील यांनी प्रतिनिधिक मनोगत मधून आरोग्य जागरूकता अभियानाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव श्रीराम दाउतखाने यांनी केले तर श्री समस्त माहेश्वरी पंचचे अध्यक्ष व इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे चेयरमन राजेंद्र माहेश्वरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे उपाधक्ष डॉ अर्जुन लालचंदाणी, लायन्स क्लब झोन चेयरमन सतीश चौधरी अध्यक्ष डॉ शिरीष शिंदे, सचिव दिनेश वाडेकर, ट्रेझरर डॉ चेतन बच्छाव यांचेसह माहेश्वरी समाज जिल्हा सचिव विजय सारडा यांनी केले. या प्रसंगी शहरातील आरोग्य प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.



