*आदिवासी महिलांसाठी सुवर्णसंधी,‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’योजनेसाठीअर्ज करावे-अनय नावंदर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी महिलांसाठी सुवर्णसंधी,‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’योजनेसाठीअर्ज करावे-अनय नावंदर*
*आदिवासी महिलांसाठी सुवर्णसंधी,‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण’योजनेसाठीअर्ज करावे-अनय नावंदर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलांसाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजना सुरु असून पात्र महिलांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोद्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. योजनेत खालील ‘अ’ गटातील (उत्पन्न निर्मितीच्या/वाढीच्या) योजनांसाठी अर्ज करता येईल: लाभार्थी हिस्सा प्रतिपूर्ती: इतर शासकीय विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी भरावा लागणारा लाभार्थी हिस्सा आता या योजनेतून परत केला जाईल.
वैयक्तिक व्यवसाय: महिलांसाठी वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा उत्पन्नात वाढ करण्यासाठी अर्थसहाय्य. सामूहिक व्यवसाय महिला बचत गट किंवा महिलांसाठी सामूहिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य. अटी व अर्ज प्रक्रिया:
इच्छुक व पात्र आदिवासी महिला लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज 10 नोव्हेंबर, 2025 पर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर अर्ज सादर करता येणार नाही, याची नोंद घ्यावी. ज्या महिला किंवा महिला बचत गटांनी सन 2022 -23 ते 2024-25 या तीन वर्षांत किंवा चालू वर्ष 2025-26 मधील कोणत्याही योजनेत लाभ घेतलेला नसेल, त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येईल. सन 2025-26 या आर्थिक वर्षात एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळेल. योजनेसाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नमुना नंबर 8-अ, ग्रामभेचा ठराव, रहिवासी दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, योजनेतून लाभ न घेतल्याचा स्वयंघोषणापत्र, शासकीय सेवेत नसल्याचा दाखला आणि योजनेनुसार आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा दूरध्वनी क्रमांक 02567-232220 कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



