*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करू-आ.बालाजी कल्याणकर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करू-आ.बालाजी कल्याणकर*
*स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करू-आ.बालाजी कल्याणकर*
नायगांव(प्रतिनिधी):-आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमची कोणासोबत युती होईल अथवा न होईल आम्ही सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आज रविवारी नायगांव तालुक्यातील कृष्णूर (एमआयडीसी) परिसरातील समाधान हॉटेल येथे नायगांव तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे उमेश मुंडे अपर्णा नेरलकर, दर्शणसिंग सिदू , उमेश मुंडे, श्याम बन, श्याम वानखेडे, ज्ञानेश्वर बेलकर, शिवाजी पन्नासे, गणेश बोकारे, प्रल्हाद पिंपळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की, कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध योजना आणि आजतागायत त्यांनी करीत असलेले कार्य त्यांचे विचार घराघरात पोहोचवा नक्कीच आपणाला येणाऱ्या निवडणुकीत यश मिळणार असा आत्मविश्वास व्यक्त केला याप्रसंगी कैलास तेलंग टेंभुर्णीकर यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आ. बालाजी कल्याणकर यांनी पक्षप्रवेश दिला बैठकीला नरसी, बरबडा, कुंटूर, मांजरमसह नायगांव तालुका परिसरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



