*नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नंदुरबार तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नंदुरबार तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक संपन्न*
*नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नंदुरबार तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक संपन्न*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नंदुरबार तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक घेण्यात आली, सदर बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी भाई नगराळे,
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार एडवोकेट गोवाल के पाडवी, माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक प्रकाश सोनवणे, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, राजेंद्र कृष्णराव गावित, किसान सेलचे प्रदेश चिटणीस देवाजी चौधरी, पंडित पवार, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी, दिशा समितीचे सदस्य खंडेराव पवार, माझी न.पा. सदस्य इकबाल खाटीक, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भाई नगराळे यांनी बूथ मॅनेजमेंट त्याचप्रमाणे बूथ क्षेत्रातील मतदार याद्या तपासण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले. मत चोरी होऊ नये म्हणून मतदार यादी नीट तपासून घ्यावी, एकाच पत्त्यावर किती मतदारांची नोंदणी झालेली आहे हे तपासून प्रत्येक मतदाराची खात्री करून घ्यावी यासंदर्भामध्ये सूचना केल्या. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या निवडणूक आहेत त्यांचा सन्मान करण्याची वेळ आहे असे सांगितले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणून स्थानिक पातळीवर आघाडीमधील पक्षांबरोबर चर्चा करावी आणि ठराव करावा अशी श्रेष्ठींची इच्छा आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये कोणीही जाऊ नये असा निर्णय झालेल्या आहे त्याचबरोबर युतीमधील कोणत्याही पक्षाशी तडजोड करू नये असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदेश पातळीवरून देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेसाठी प्रत्येक तालुका आणि तेथील परिस्थिती लक्षात घेऊन आणि राज्य तसेच देश पातळीवरील मुद्दे घेऊन जाहीरनामा तयार करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पक्षाच्या तालुकावर बैठका झाल्यानंतर प्रत्येक गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात यावे त्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक दिलीप नाईक यांनी केले. राजेंद्र कृष्णराव गावित यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रगीत गाऊन सभेची सांगता करण्यात आली.



