*भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद अशपाक उल्ला खान यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद अशपाक उल्ला खान यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी*
*भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद अशपाक उल्ला खान यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद अशपाक उल्ला खान यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. नंदुरबार येथील इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन व जनसेवा महिला बचत गटातातर्फे संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद स्वतंत्र सेनानी अशपाक उल्ला खान यांनी फक्त 27 व्यावर्षी ब्रिटिश हुकूमतद्वारे 19 डिसेंबर 1927 मध्ये फाशी दिली होती. अश्फाक उल्ला खान यांची जयंती इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या मुख्य कार्यालयात संस्थेच्या संस्थापिका जुबेदा इस्माईल बागवान यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी सुरुवातीला शहीद अशपाक उल्ला खान यांच्या प्रतिमेला किसान काँग्रेस विभागाचे प्रदेश सचिव देवाजी चौधरी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांनी आपले मनोगताच सांगितले की, स्वतंत्र सेनानी भारतीय स्वतंत्रता संग्रामचे अमर शहीद अश्फाक उल्ला खान यांची त्यावेळी फक्त 27 व्या वर्षी फाशीवर खुशी खुशी चढणारे असे महायुद्धांना सर्व मान्यवरांच्या तर्फे सलामी देऊन अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते सय्यद मकसूद, ज्येष्ठ हाजी युनूस पिंजारी, मुस्लिम धोबी समाजाचे कार्यकर्ते इमरान धोबी, जनसेवा महिला बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष रुकसाना बागवान, सचिव उजमा बागवान, सामाजिक कार्यकर्ती शकीला सय्यद, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या सचिव हलीमा बागवान, बचत गटाचे संचालिका आमेरा बागवान, सायमा नाज आदि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फैयान बागवान, रेहान धोबी, फरहान लाला, मुसद्दीक मन्सुरी,आदींनी परिश्रम घेतले.



