*काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका निम्मित आढावा बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका निम्मित आढावा बैठक संपन्न*
*काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका निम्मित आढावा बैठक संपन्न*
नवापूर(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील सिनिअर कॉलेज येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका निम्मित नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे भाई नगराळे, नवापूर विधानसभेचे आमदार तसेच नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरिषकुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, नंदुरबार जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष ललिता वसावे, माजी जिल्हा परिषद सदस्य राया मावची, नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, वापर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सोहेल बलेसरिया, माझी जिल्हा परिषद सदस्य रतन गावित, नवापूर शेतकी संघाचे संचालक तानाजी वळवी, नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक दादा गावित, नवापूर बाजार समितीचे उपसभापती विनायक गावित, पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवा गावित, नवापूर पंचायत समितीच्या माजी सभापती बबिता गावित, माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, माजी नगराध्यक्ष दामू बिराडे, फैझल शेख,
मा.जिल्हा परिषद सदस्य तसेच मा. पंचायत समिती सदस्य, आणि नगरपालिका मा. नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते, तसेच इच्छुक उमेदवार आणि सर्व सेलचे अध्यक्ष व युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, तसेच महिला, काँग्रेस पक्षाचे आजी माजी सरपंच, ग्रा.प.सदस्य, हजारों संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वः बळावर लढविण्यात येणार आहे. यावेळी नवापूर शहरातील असंख्य राष्ट्रवादी अजित पवार गटातील कार्यकर्ते आमदार याच्या उपस्थिततीत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.



