*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
*राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघ रवाना*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य अम्युचेअर नेटबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धा छञपती संभाजीनगर येथे 28 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपन्न होणार आहे. सदर स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्याच्या संघास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मधुकर पाटील, मोहन माळी, अँड प्रकाश भाई, मालती वळवी, मोंटू जैन, पप्पू कुरेशी, मोहन ढोणे तसेच नंदुरबार जिल्हा नेटबॉल संघटनेचे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते बी बी निकुंभ, सचिव राजेंद्र पाटील, तुषार सोनवणे व सर्व खेळाडू उपस्थित होते.



