*फेसबुकवर आक्षेपार्ह व सामाजिक शांतता बिघडवणारा प्रक्षोभक व्हिडीओप्रसारीत,करणारा पोलीसांच्याअटकेत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*फेसबुकवर आक्षेपार्ह व सामाजिक शांतता बिघडवणारा प्रक्षोभक व्हिडीओप्रसारीत,करणारा पोलीसांच्याअटकेत*
*फेसबुकवर आक्षेपार्ह व सामाजिक शांतता बिघडवणारा प्रक्षोभक व्हिडीओप्रसारीत,करणारा पोलीसांच्याअटकेत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-काही दिवसांपुर्वी नंदुरबार शहारात जयेश वळवी नामक युवकाची सुर्यकांत सुधाकर मराठे ऊर्फ भैय्या मराठे याने वैयक्तीक वादातुन केलेल्या हत्येमुळे त्याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाणे नंदुरबार गु.र.नं.258/2025 भा. न्या.स. कलम 103 (1), 109, 352 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल असुन आरोपी सुर्यकांत मराठे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने इसमनामे जय नंदराज रायसिंग (कोळी), याने त्याच्या जय कोळी नामक फेसबुक अकाऊंटवरुन अटक आरोपी सुर्यकांत मराठे याच्या समर्थनार्थ एक प्रक्षोभक व्हिडीओ प्रसारीत केला होता. सदर व्हिडीओतील शब्दांकन पाहता दोन समाजात पुन्हा तेढ निर्माण होवुन सामाजिक शांतता बिघडण्याची मोठी संभावना निर्माण झाली होती. त्यामुळे जय नंदराज रायसिंग (कोळी), याच्या विरोधात 22 ऑक्टोबर 2025 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 620/2025 भा.न्या.सं. कलम 192, 196(1) ((अ), (ब)), 353 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असुन त्यास न्यायालयाकडुन 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तरी गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरु आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते कि, नागरिकांनी घडलेल्या घटनेबाबत योग्य माहीती घेवुन सोशल मिडीयावर व्यक्त व्हावे, तसेच आपल्या वक्तव्य / कृतीमुळे दोन समाजात किंवा जाती जातीत तेढ निर्माण होवुन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनुचित पोस्ट/व्हिडीओ व्हायरल करु नये. तसेच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडीओ प्रसारीत करु नये, अन्यथा संबधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.



