*नाल येथे भाथीजी महाराज जन्म जयंती उत्सव, अर्थात एकमचा कार्यक्रम संपन्न होणार*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नाल येथे भाथीजी महाराज जन्म जयंती उत्सव, अर्थात एकमचा कार्यक्रम संपन्न होणार*
*नाल येथे भाथीजी महाराज जन्म जयंती उत्सव, अर्थात एकमचा कार्यक्रम संपन्न होणार*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-22 ऑक्टोबर 2025 रोजी नाल ता. सागबारा (गुजरात) येथे भाथीजी महाराज जन्म जयंती उत्सव अर्थात एकम लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होत असून या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन भाथीजी सेवा संघ ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे. उद्या 22 ऑक्टोबर 2025 रोजी नाल ता. सागबारा (गुजरात येथे आद्य संस्थापक परमपूज्य माधुदास जी महाराज यांच्या प्रेरणेने व मुख्य आचार्य परमपूज्य गोविंददास महाराज यांच्या आशीर्वादाने भाथीजी सेवा संघ ट्रस्टचे अध्यक्ष परमपूज्य अजबसिंग महाराज व ट्रस्टच्या वतीने भातीजी महाराज जन्म जयंती उत्सव अर्थात 56 वी एकम साजरी होत असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री गणपतसिंह वसावा माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित मंत्री कुवर हडपती, खासदार प्रभू वसावा, खासदार मनसुख वसावा, खासदार एड.गोवाल पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक अमरसिंह वसावा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी गुजरात राज्यासह मध्यप्रदेश राजस्थान व महाराष्ट्र राज्यातील सुमारे तीन लाख भाथीजी संप्रदायाचे अनुयायी तसेच भाविक उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन नाल गावासह परिसरातील गावांतील सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रातील नागरिकांचे योगदान लाभणार आहे. या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाथीजी सेवा संघ ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये भाथीजी महाराज संप्रदायाचा मुख्य उद्देश असलेल्या समाजातील व्यसनमुक्ती अंधश्रद्धा सामाजिक कुप्रथांचे उच्चाटन करणे तसेच जीव- दया, भक्ती यांच्या प्रचार आणि प्रसार करणे आहे.कार्यक्रम स्थळी सकाळी संत महंतांचे आगमन प्रमुख अतिथींचे स्वागत तसेच भजन - कीर्तन व सत्संग तसेच महाप्रसादाचे आयोजन आहे.
भाथीजी महाराज संप्रदायाचे वाडीधाम ता. सागबारा (गुजरात) येथे 132 वर्षांपूर्वी संस्थापक भानुदास महाराज यांनी स्थापना केली आहे.त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवत 1972 पासून मुख्याचार्य परमपूज्य गोविंदास महाराज यांनी अविरत सुरू ठेवले आहे त्यांच्या सत्संगाच्या माध्यमातून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान व महाराष्ट्र राज्यांतील तब्बल सुमारे सात ते आठ लाख लोकांना व्यसनमुक्त केले आहे.